दोन नक्षल्यांना आजन्म दुहेरी कारावासाची शिक्षा

0
7
गोंदिया,दि.१७ः- गोंदिया जिल्ह्यातील चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या मिसपिरी -धमदीटोला येथे १ डिसेंबर २०११ रोजी कोरची-कुरखेडा-खोब्रामेंढा दलमच्या नक्षल्यांनी केलेल्या हमल्यात १ पोलीस शिपाई ठार व ५ जखमी झाल्याची घटना घडली होती.त्याप्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या दोन नक्षल्यांना गोंदिया जिल्हा सत्र न्यायालय क्र.१ चे न्यायाधिश एस.आर.त्रिवेदी यांनी दुहेरी आजीवन कारावासाची शिक्षा सोबतच प्रत्येकी २१ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.
सविस्तर असे की १ डिसेंबर २०११ रोजी नक्षल्यांनी केलेल्या हल्यात चिचगड पोलीस ठाण्याचे शिपाई मनोज बिंझाडे हे शहिद झाले होते.तर इतर ५ शिपाई जखमी झाले होते.त्याप्रकरणात बुदरु उर्फ दिनेश उर्फ कृष्णा राजवंशीय सिरसाम(२६,रा.मावे.पो.ईटार,तहसिल छुईखदान,जि.राजनादंगाव) व दिनेश उर्फ अर्जुन उर्फ शांताराम महारु मडावी(२९,इरगट्टा,पो.कसनसुर मिट्टापल्ली,जि.गढचिरोली) यांना मुख्य आरोपी असल्याचे मान्य करीत दुहेरी आजिवान शिक्षा ठोठावण्यात आली आहे. २ ते ९ डिसेंबर दरम्यान नक्षल्यांनी पीएलजीए सप्ताहाचे आवाहन केले होते.त्यादरम्यान १डिसेंबर २०११ ला मिसपिरी-धमदीटोला येथील सरपंचाने चिचगढ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या गणुटोला पोलीस चौकीत नक्षल्यांनी फलक व बॅनर लावल्याची माहिती दिली होती.त्या माहितीचा तपास करण्याकरीता पोलीस चौकीतील ५ शिपायांना पाठविण्यात आले होते.पोलीस ते बॅनर ताब्यात घेत असताना घात लावून बसलेल्या १०-१२ नक्षल्यांनी या पोलीसावंर गोळीबार केला.ज्यामध्ये पोलीस शिपाई मनोज आत्माराम qबझाडे हे शहिद झाले.तर इतर ५ पोलीस शिपाई बचाव करीत तिथून निघण्यात यशस्वी झाले होते.त्याप्रकरणात पोलीस शिपाई अजय बनसोड यांनी कोरची-कुरखेडा खोब्रामेंढा दलमच्या १० नक्षल्याविरोधात भांदवी कलम ३०२,३०७.१४३.१४७,१४८,१४९,५०६(ब),१२१,१२१(अ),३५३,३९५ अंतर्गत तसेच सहा.कलम १८,२०,२३ नक्षल गतिविधीत सहभाग,भारतीय हत्यार कायदा आदी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.या प्रकरणात सरपंच फगनु दर्जी कल्लो यास नक्षल्यांना सहकार्य केल्याप्रकरणी २ डिसेंबर २०११ रोजी ताब्यात घेण्यात आले होते.त्यानंतर तीन नक्षल्यांना २ डिसेंबर २०१२ रोजी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले होते.याप्रकरणात १८ साक्षिदार व आरोपींची ओळखपरेड करण्यात आली होती.त्यानुसार न्यायाधिश एस.आर.त्रिवेदी यांनी दोन नक्षल्यांनी दोषी ठरवित दुहेरी आजीवन शिक्षा ठोठावली.तर अन्य दोन आरोपीमध्ये असलेल्या सरपंच फगनु दर्जी कल्लो(वय ४४) व नक्षली प्रकाश उर्फ देवीदास उर्फ गढवे-गाढवे उर्फ गावड(वय ३६,रा.मर्दपुर,तह.भामरागड,जि.गडचिरोली) यांना पुराव्या अभावी सोडण्यात आले.या प्रकरणात सरकारी वकील म्हणून कैलास खंडेलवाल व महेश चांदवानी यानी काम पाहिले.