राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक जाळ्यात

0
8

धुळे : बियर शॉपीच्या नूतनीकरणासाठी धुळ्यातील कामकाज पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज मून व वरिष्ठ लिपिक रविंद्र अहिरे यांना गुरूवारी दुपारी कार्यालयातच रंगेहाथ पकडण्यात आले़ दरम्यान, नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय अधीक्षक धनराज महादेवराव मून (५८, रा़ मुंदडा नगर, गायत्री प्रोव्हीजन मागे, जळगाव) हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार होते़ मात्र, तत्पूर्वीच त्यांच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत़ मून यांच्या जळगावातील घराची झडती घेण्यात आली़ तर रविंद्र जगन्नाथ अहिरे (४३, रा़ नवजीवन हौसिंग सोसायटी,नकाणे रोड, देवपूर, धुळे) यांच्या घराचीही पथकाने सायंकाळी उशिरापर्यंत झडती घेतली़ मात्र, त्यात फारसे काही आढळले नसल्याचे सांगण्यात येत आहे़