लाँग मार्चमध्ये जिल्ह्यातील ५५० कर्मचारी सहभागी होणार

0
11

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे नाशिक पासून मुंबईपर्यंत १८ मे पासून लाँग मार्च काढला जाणार आहे. यामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून जवळपास ५५० एनआरएचएम कर्मचारी सहभागी होतील अशी माहिती एनआरएचएम संघटनेच्या पदाधिकाºयांनी पत्रकार परिषदेत दिली.
एनआरएचएमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाºयांना शासकीय सेवेत बिनशर्त समावून घ्यावे या मागणीसाठी यापूर्वी ११ ते २१ एप्रिल या कालावधीत कामबंद आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण २२ हजार तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ८६२ कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले. सर्व मागण्या १० दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र मागण्या मान्य झाल्या नाही. त्यामुळे ८ मे पासून पुन्हा आंदोलन सुरू केले. सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. दुसºया टप्प्यातील आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून तीन मंत्र्यांची समिती गठित केली. मात्र या समिती संदर्भात शासन निर्णयात असलेल्या उल्लेखांवरून सदर समिती केवळ फार्स असल्याचे आढळून येते अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अभ्यास समितीला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला आहे. आरोग्य विभागात सुमारे २० हजार पदे रिक्त आहेत. सदर पदे नव्याने भरती प्रक्रिया न घेता एनआरएचएममध्ये कार्यरत कर्मचाºयांमधून त्यांचे समायोजन करावे, तशा प्रकारचा शासन निर्णय काढणे आवश्यक असताना शासन केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. आरपारची लढाई लढण्यासाठी १८ मे पासून नाशिक ते मुंबई दरम्यान लाँगमार्च काढला जाणार आहे. जवळपास १० दिवसानंतर आंदोलनकर्ते मुंबई येथे पोहोचतील. मुंबई येथील आझाद मैदानावर त्यानंतर धरणे आंदोलन केले जाईल. त्यानंतरही शासनाने ठोस कार्यवाही न केल्यास कुटुंबासह बेमुदत उपोषण केले जाईल, अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. मध्यप्रदेश, दिल्ली, गोवा, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये एनआरएचएम कर्मचाºयांना शासकीय सेवेत कायम केले आहे. तर आंध्रप्रदेशात समान काम, समान वेतन दिले जात आहे. महाराष्टÑ शासनानेही एनआरएचएम कर्मचाºयांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास काही अडचण नाही. मात्र शासन केवळ वेळ मारून नेण्याचे धोरण अवलंबित आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बांबोळे, सचिव जितेंद्र कोटगले, कोषाध्यक्ष चंद्रकांत मेश्राम, डॉ. अनुपम महेशगौरी, चेतन निमगडे, महेश कामडी, नंदकिशोर मेश्राम, किरण रघुवंशी, मोहिता गौरकर यांच्यासह आंदोलनकर्ते कर्मचारी व अधिकारी हजर होते.