हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक निवडणुक केंद्रावर जामर लावण्यात यावे : नाना पटोले

0
13
भंडारा,दि.१८ – कर्नाटक विधानसभेचा हुबळी मतदारक्षेत्रात ईव्हीएम मशिनमध्ये आकड्यांची हेराफेरी करण्यात आली. त्यासाठी भंडारा व गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत हेराफेरी होवू नये म्हणून प्रत्येक मतदानवेंâद्रावर जामर कींवा व्हीव्हीपोर्ट लावले पाहिजेत असे माजी खासदार नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या भवनात दिनांक १८ मे रोजी झालेल्या पत्रकारपरीषदेत सांगितले.
 कर्नाटक निवडणूक झाल्यानंतर आता भाजपमध्ये  सत्तेत सहयोगी असलेला  शिवसेनेचे पक्षनेतेसुध्दा ईव्हीएम निवडणूक मशिनवर शंका उत्पन्न करीत आहेत.आम्हीसुध्दा चुनाव अधिकारी यांना लोकतांत्रिक पध्दतीने व निष्पक्षपणे निवडणूक व्हावी यासाठी गुजरातमधील सुरतमधूनच ईव्हीएम मशिनची मागणीबाबत विरोध केला व तसे निवेदन खासदार प्रफुल पटेल व मी सुध्दा निवडणूक अधिकार्याकडे दिले आहे.भाजपच्या शासनामुळे लोकतंत्र धोक्यात येण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशिनला विरोध केला आहे.आता तरी लोकांनी जागे होण्याची गरज आहे असे माजी खासदार नाना पटोले म्हणाले.
 ते पुढे म्हणाले की, केंद्रात व राज्यात भाजपचे सत्ताधारी शासन आहे.पण रीमोट कंट्रोलमुळे कुणाला आपल्या समस्या मांडण्याचा अधिकार नाही.त्यामुळेच मी स्वत: खासदार पदाचा राजीनामा दिला आहे.यापूर्वीही आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न ज्या नेत्यांनी केला त्याचाही एकनाथ खडसे आणि गोपिनाथ मुंडे यांच्या सारखाच गेम झालेला आहे.शेतकर्यांच्या कृषिमोटारपंपांना चोविस तास विज पुरविण्याचे आश्वासन भाजपच्या सत्ताधार्यांनी दिले होते.परंतू ते आश्वासन आज खोटे ठरले आहे. प्रधानमंत्री यांच्यासारखे मोठे नेते संयम सोडून बोलत असतात. कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत दिसून आले.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री लोकसभा निवडणूकीत आचारसंहितेचा भंग करतात.त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही.ही लोकशाहीची परंपरा नाही.मी लोकशाही मानणारा व्यक्ती असून शेतकरी व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढवित आहेत.तिन वेळा आमदार राहिलेले मधुकर कुकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.मधुकर कुकडे यांना लोकांच्या समस्येची जाणीव आहे.पण भाजपच्या माजी आमदार असलेल्या हेमंत पटले यांना चांगल्यारीतीने बोलतासुध्दा येत नाही. त्यामुळे भाजप उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस उमेदवार वरचढ आहे.  भंडारा, गोंदिया लोकसभेची पोटनिवडणूक परीवर्तनाची नांदी ठरणार आहे.देशातील मोठ्या नेत्यांचे भंडारा,गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीकडे लक्ष लागले आहे. अन्याय करणारी व्यवस्था हाणून पाडण्यासाठी शेतकर्यांच्या व बेरोजगार लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी खोटे आश्वासन देवून लोकांना भुरळ पाडणार्या भाजपला धडा शिकविण्याची हीच वेळ आली आहे. त्यासाठी आम्ही कसोशिने प्रयत्न करणार आहोत असेही पत्रकार परीषदेत माजी खासदार नाना पटोले यांनी सांगितले यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय चे  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.