महाराष्ट्रात चार दिवस आधीच दाखल होणार मान्सून

0
14

पुणे,दि.18- मान्सूनचे आगमन यंदा केरळमध्ये चार दिवस आधीच होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर चार दिवसांत कोकणात धडकण्याची चिन्हे आहेत. मान्सून 23 मे रोजी अंदमानला दाखल होणार आहे.अंदमानपासून तळ कोकणात मान्सून पोहोचण्यास 17 ते 21 दिवसांचा कालावधी लागतो पण बरेचदा वादळी स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेमध्ये अडकून पडतो. मान्सून दरवर्षी सर्वसाधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र या वर्षी तो वेळापत्रकाच्या तब्बल 7 दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळ किनारपट्टीजवळ 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.