शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नरेंद्र भोंडेकर

0
17

भंडारा,दि.19ः-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोंडेकर हे भंडारा – पवनी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.
नियुक्ती दरम्यान शिवसेना खासदार अनिल देसाई, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, भंडारा – गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ उपस्थित होते.
यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची पोटनिवडणूक लढत असलेले आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष किशोर पंचभाई व त्यांचे इतर सहकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, विजय काटेखाये, प्रशांत भुते सह पदाधिकारी उपस्थित होते.