20 मे रोजी अकोल्यात शेतकरी संघटनेची राज्यव्यापी तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद

0
22
अकोला,दि.19ः- कधी काळी जय जवान! जय किसान!!जय विज्ञान!! चा नारा देणारे व २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान कमीत कमी सरकारचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले भाजपा आज यत्र,तत्र,सर्वत्र सत्तेत असतांना काँग्रेस च्या धोरणांचे ओझे भाजपा अधीक बावळटपणे डोक्यावर वाहवत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यांत मोठा ताप निर्माण झाला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर २० मे रोजी अकोला येथे आयोजीत तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट,माजी आमदार ऍड.वामनराव चटप,माजी आमदार सरोजताई काशीकर,माजी अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर,स्व.भा.प.चे राज्य अध्यक्ष ऍड.दिनेश शर्मा; शेतकरी संघटना तंत्रज्ञान आघाडी चे अजीत नरदे यांचेसह शेतकरी संघटनेच्या प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे,युवा आघाडी राज्य प्रमुख सतिष दाणी, कार्यकारिणीचे अनेक सदस्य उपस्थीत राहणार आहेत.सकाळच्या सत्रात तंत्रज्ञान  विषयक चर्चा होणार असून  या चर्चेत तंत्रज्ञान विषयातील तज्ञ डॉ.विलास पारखी,डॉ. शिवेंद्र बजाज,डॉ.दत्तात्रय शिरोळे,डॉ.सुभाष थेटे, डॉ.वृषाली बेडसे, मार्गदर्शन करणार आहेत.दुसऱ्या सत्रात जेवणानंतर शेतकरी संघटनेचे सत्र होणार आहेत.

 तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषदला राज्य भरातील जाणकार हजर राहणार असून मोठया प्रमाणात शेतकरी व शेती व शेतकऱ्यांविषयी आस्था बाळगणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत राहणार आहेत. तरी मोठया संख्येने विदर्भातील शेतकऱ्यांना  उपस्थीत रहाण्याचे आवाहन आयोजन समिती प्रवक्ता शेतकरी संघटना ललीत बहाळे,महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ.निलेश पाटील,प.विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांचेसह संपूर्ण शेतकरी संघटना अकोला जिल्हा यांनी केले आहे.