केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची २० व २१ रोजी जाहीर सभा

0
9

गोंदिया,दि.१९ :  भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत(तानुभाऊ) पटले यांचा निवडणूक प्रचारार्थ केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात येत आहेत.  २० आणि २१ मे रोजी त्यांच्या प्रचार सभेचे आयोजन तिरोडा, तुमसर, सडक अर्जुनी आणि लाखांदूर मध्ये करण्यात आले आहे. या वेळी आपल्या प्रखर मार्गदर्शनातून ते जनतेला संबोधित करतील.

त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार ते २० मे रोजी दुपारी ५.०० वाजता तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालय पटांगणावर व सायंकाळी ७.३० वाजता तुमसर येथील संताजी मंगल कार्यालय येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करतील. तसेच २१ मे रोजी दुपारी ५.०० वाजता सडक अर्जुनी येथील पंचायत समिती समोरील पटांगणांवर व सायंकाळी ७.३० वाजता लाखांदूर येथील नगर पंचायती जवळ आयोजित जाहीर सभेला संबोधित करतील. श्री गडकरी यांच्या स्वागत आणि सभेसाठी कार्यकर्ता मोठ्या उत्साहाने तयारीला लागले आहे. केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितिन गडकरी यांचे विचार ऐकण्यासाठी जनसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री,  गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बंडोले, आमदार अनिल सोले, आमदार डॉ.परिणय फुके,  भंडारा जिल्हा अध्यक्ष तारिक कुरैशी,  आमदार विजय रहांगडाले,  आमदार संजय पुराम, आमदार चरण वाघमारे,  आमदार अॅड.रामचंद्र अवसरे,  आमदार राजेश काशिवार,  गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे,  भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, सर्व माजी खासदार, सर्व माजी आमदार, पदाधीकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.