प्रकल्पग्रस्तांचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार

0
14

भंडारा,दि.२०ःगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्या निराकरणासाठी २३ एप्रिल रोजी महत्त्वाचे शासन निर्णय झाले. परंतु, महिना लोटुनही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरणार्थ मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत २३ एप्रिल रोजी सह्यांद्री भवन मुंबई येथे बैठक घेण्यात आली. ाल्हाधिकार्‍यांना दिला आहे.
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निराकरणार्थ मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आ. बच्चू कडू यांच्या उपस्थितीत २३ एप्रिल रोजी सह्यांद्री भवन मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. प्रकल्पग्रस्त आणि प्रत्येक अपत्यास वाढीव कुटुंब म्हणून संपूर्ण लाभ देणे, शेतीचे पुनर्वसन गाठठाण यातील अंतर ८ कि.मी. असल्यास शेती संपादीत करणे, भविष्यात धरणामुळे बाधित होणार्‍या गावाचे पुनर्वसन करणे, मच्छीमारांना मासेमारीचे आजीवन हक्क देणे, गावठाणाबाहेरील घरांना आर्थिक मोबदला देऊन पुनर्वसीत करणे, प्रकल्पग्रस्तांना मुद्रा लोनची व्यवस्था करणे, नागरी सुविधा पुरविणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल देणे, आदी निर्णयांचा समावेश होता. परंतु, अजुनही यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी २८ मे रोजी होणार्‍या लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन प्रहार गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे मंगेश वंजारी, यशवंत टिचकुले, रुपेश आथीलकर, सुभाष वाघमारे, सोमेश्‍वर भूरे, गणेश आगरे, मारोती हागरुडे, भाऊ कातोरे, जिजा मेर्शाम, विनोद पेशने, रिजवान शेख, कवडू गाढवे आदींनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.