दंतेवाड्यात ५ जवान शहिद,नक्षल पोलीस चकमक

0
14
file photo

रायपूर,दि.२०(वृत्तसंस्था): छत्तीसगढ च्या दंतेवाडा जिल्ह्यातील आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास नक्षलांनी आयईडी भूसुरंग विस्पोट केला यात ५ पोलिस जवान शाहिद झाले असुन २ गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या स्पोटात जखमी जवानांना प्राथमिक उपचारानंतर रायपूरला स्थलांतर केले आहे.
सविस्तर वृत्त असे आहे कि, बेळली ते चोलणार रस्त्यावर रस्ता बांधकाम प्रगतीपथावर सुरु असुन या कामात काम करणारे कामगार व इतर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सी.ए.एफ. व डीएफ यांच्या संयुक्त पोलिस जवान कामाच्या स्थळी म्हणजे बचेली येथे जात असतांना घात लावून बसलेल्या नक्षलांनी भूसुरुंग विस्फोट केला यात भूसुरुंग वाहनात एकूण ७ जवान उपस्थित होते. स्फोट इतका शक्तिशाली होता की भूसुरुंग वाहन उडाली व त्याचे तुकडे झाले आणि जमिनीवर दहा फूट खोल खड्डा तयार झाला. यात नक्षलांनी जवानांचे बंदुका व सामुग्री घेऊन गेले असल्याची माहिती आहे.  होता. एकूण 7 सैनिक गाडीमध्ये होते. नक्षलवादी शक्तींनीही शस्त्रे काढून घेतली आहेत.
तसेच बस्तर पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी शाहिद जवानांना सांत्वना दिली व संपूर्ण क्षेत्रात शोधकार्य करून अलर्ट कराचे आदेश दिले आहे.