लोकसभा पोटनिवडणूक मतदान यंत्राची प्राथमिक तपासणी

0
11

गोंदिया,दि.२० : लोकसभा पोटनिवडणूकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज २० मे रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय गोंदिया येथे राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान यंत्र सुस्थितीत आहेत किंवा नाही याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) शुभांगी आंधळे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, सालेकसा तहसिलदार प्रशांत सांगळे, आमगाव तहसिलदार साहेबराव राठोड, नायब तहसिलदार सर्वश्री सोमनाथ माळी, ओमकार ठाकरे, राजश्री मलेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी अशोक सहारे व अन्य राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.