पत्रकारांच्या आरोग्यासाठी नियोजन समितीतून निधी देऊ! पालकमंत्र्यांची ग्वाही

0
10

नांदेड,दि. २१ः-नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्वांगीण विकास व जनतेच्या कामांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांनी शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात योगदान दिले आिाण देणार आहेतच, अशा पत्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी मनपाने ७५ लाखांच्या आरोग्य निधीची तरतूद करावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री भाई रामदास कदम यांना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी दिल़्ो़ तेव्हा ना़कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतूनच हा निधी देण्याबाबत आपण अवश्य प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली़.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी पालकमंत्री रामदास कदम हे सोमवारी नांदेडला आले होते़ नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांना जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक निवेदन दिले़. यावेळी ना़कदम यांनी आ़हेमंत पाटील यांना याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले़ या निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना व माहिती जनतेपर्यंत पोहचवून जनता मनपा व शासनाला पत्रकारांनी नेहमीच सहकार्य केले आहे़.परंतु बहुतांश पत्रकारांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते आणि त्यातही आजारपणासारख्या समस्यांना तोंड देताना प्रचंड ओढाताण होते़. त्यामुळे पत्रकारांना आरोग्यासाठी आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे़. या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली,अकोला, सोलापूर ,मुंबई महापालिकेने पत्रकारांच्या आरोग्य निधीची तरतूद केली आहे़ अशीच तरतूद नांदेड मनपानेही ७५ लाखांची करावी़
मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपरोक्त मागणीचे निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीतून त्यासाठी ७५ लाखांची खास तरतूद करु, अशी ग्वाही दिली़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय जोशी, चारूदत्त चौधरी, प्रकाश कांबळे, प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी, सुभाष लोणे, धोंडोपंत विष्णुपुरीकर, राजेश शिंदे, कृष्णा उमरीकर, लक्ष्मण भवरे,प्रवीण खंदारे, विश्वनाथ देशमुख, प्रशांत गवळे, रवींद्र संगनवार,अभय कुळकजाईकर,अनुराग पवळे, दिगंबर बावस्कर,मारोती कोंडावार, राजकुमार कोटलवार, प्रल्हाद लोहेकर,कमलाकर बिरादार,राजकुमार स्वामी, प्रमोद गजभारे,गोविंद करवा,प्रविण खंदारे, कुवरचंद मंडले,सतीश मोहिते,राजुरा गिरी, महेंद्र देशमुख आदी उपस्थित होते असे प्रसिध्दी प्रमुख नंदकुमार कांबळे यांनी कळविले आहे़ .