राजीव गांधी यांनी देशाच्या विकासाला गती दिली

0
14

नागपूर,दि.22 : देशाच्या विकासात आजवरच्या सर्वच पंतप्रधानांचे योगदान आहे. परंतु माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी माहिती व तंत्रज्ञानाची दारे खुली केली. पंचायतराज व महिला सक्षमीकरणावर अधिक भर देऊन खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला गती दिली. म्हणूनच आज आपल्या देशाची महाशक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मनोगत सोमवारी देवडिया काँग्रेस भवन येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणात राजीव गांधी यांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. नागपूर शहर काँग्रेस कमिटी व राजीव गांधी स्टडी सर्कल यांच्या संयुक्त विद्यामाने भारतरत्न माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्राचार्य हरिभाऊ केदार, विदर्भ संघटक, राजीव गांधी स्टडी सर्कल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. बबनराव तायवाडे, नासुप्रचे माजी विश्वस्त अनंतराव घारड, उमाकांत अग्निहोत्री, सचिव अतुल कोटेचा, उपाध्यक्ष बंडोपंत टेंभुर्णे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, कार्यप्रमुख व सरचिटणीस गजराज हटेवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, जयंत लुटे, डॉ.मनोहर तांबुलकर,जयाल जैसनानी, प्रशांत धवड, गिरीश पांडव, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, रमण पैगवार, राजेश कुंभलकर आदी उपस्थित होते.