शिवसेना माजी आमदार कुथेंचा गडकरीच्या उपस्थितीत कार्यकत्र्यासह भाजप प्रवेश

0
8

सडक अर्जुनी,दि.२२ः-गोदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपा उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत गोंदियाचे शिवसेनेचे माजी आमदार रमेश कुथे व नगरसेवक राजकुमार कुथे यांनी केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात कार्यकत्र्यांसह प्रवेश केला.याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बड़ोले,राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आ. संजय पुराम, माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आ. केशवराव मानकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले,अल्ताफ हामिद, भावना कदम, अरविंद शिवणकर,गिरधर हत्तीमारे, वीरेंद्र अंजनकर मान्यवर उपस्थित होते.
आपल्यामुळेच भंडारा गोंदियात भाजप टिकून आहे, असा नाना पटोलेचा समज होता. पण ही कार्यकत्र्यांची पार्टी आहे. कुणाच्या मालकीची नाही. कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले- प्रतिकूल परिस्थितीत कार्यकत्र्यांनी अपमान, पराभव सहन केला.विचारधारेवर चालणारी ही पार्टी असल्याचेही गडकरी म्हणाले.सामाजिक न्याय मंत्री राजकुुमार बडोले यांनी विकासाची नवीन पहाट राज्य आणि केंद्र शासनामुळे या राज्यात सुरु असल्याचेही बडोले म्हणाले.केवळ हिंदुत्व या एकाच मुद्यावर आपण भाजपात प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे या परिसरातील वातावरण बदलले होते.