सौंदड येथील महामार्गावर अपघाताची शक्यता !

0
15

* उड्डाण पुलाची मागणी
सडक अर्जुनी,दि.22 – तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सौन्दड़ हे मोठे गाव वसले आहे.बाजारपेठ असलेल्या गावातून नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग जात असून दिवसाला हजारोच्या सख्येत वाहनाची ये जा सुरु असते.या मार्गावरुन भरधाव वेगाने वाहन जात असल्याने कधीही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जनतेने उड्डाणपुलाची मागणी रेटून धरली आहे.साकोली ते देवरी मार्गावर सौंदड व कोहमारा या दोन्ही टी प्वाईंटवर वास्तविक उड्डाणपूल तयार करायला हवे होते.परंतु काही राजकारण्यामुळे उड्डाणपूल न झाल्याने त्याचा परिणाम आज वाढत्या अपघातात झाले आहे. सौन्दड़ येथे रेलवे स्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी , विध्यार्थी, बस स्थानकाच्या जागेवर मार्ग ओलांडून येतात परिणामी नागरिकांना जीव मूठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.त्यातच मुख्य मार्गावरच रेल्वेचौकी असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने याठिकाणी उड्डाणपुलाचे त्वरीत काम सुरु करावे अशी मागणी पुढे आली आहे.