प्रफुल पटेल आज सडक अर्जुनीत,अजित पवार तिरोडा व तुमसरमध्ये

0
47

गोंदिया,दि.२२-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्या प्रचाराकरीता राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल २३ मे रोजी सडक अर्जुनी तालुक्यात येत आहेत.शेंडा येथे सायकांळी ४ वाजता,खोबा ५.३०,बोपाबोडी ६.३०,तिडका ७.३०,डव्वा ८.३० वाजता प्रचारसभेला संबोधित करतील.तर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार हे २३ मे रोजी सायकांळी ३ वाजता तिरोडा येथील शहिद मिश्रा शाळेच्या प्रांगणावर आयोजित सभेला मार्गदर्शन करतील.त्यानंतर तुमसर येथे ५.३० वाजता व गणेशपूर येथे ७.३० वाजता जाहिर सभेला मार्गदर्शन करणार आहेत.पवार यांच्यासोबत माजी मंत्री अनिल देशमुख हे सुध्दा राहणार आहेत.
Ÿधनंजय मुंडे गोरेगाव व अर्जुनी मोरगावात बुधवारला
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराकरीता विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते धनंजय मुंडे हे बुधवार २३ मे रोजी गोरेगाव येथील बसस्थानक चौकात आयोजित सभेला ५ वाजता,नवेगावबांध येथे ७ वाजता सभेला मार्गदर्शन करणार आहेत.