देशी विदेशी मद्यविक्रीची दुकाने तीन दिवस बंद

0
15

भंडारा,दि.22 :- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणूक 28 मे 2018 रोजी होत आहे. तसचे 31 मे 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक खुल्या, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रीया संपण्याच्या वेळेपुर्वी 48 तासामध्ये मद्यविक्री करण्यास मनाई/ कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिल्या आहे. त्यानुसार दिनांक 26 मे 2018 च्या सायंकाळी 6 वाजतापासून मतदानाचा दिवस 28 मे 2018 सायंकाळी 6 वाजेपर्यंत व मतमोजणीचा 31 मे 2018 हा पूर्ण दिवस या तीनही दिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहे.
निवडणूक प्रक्रीया पार पडण्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हयातील देशी / विदेशी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हयातील सर्व देशी विदेशी मद्य विक्रीची अनुज्ञप्ती (सीएल-2, सीएल-3,एफएल-2, सीएल/एफएल/टिओडी-3, एफएल-3, एफएल/बीरआर-2 ) बंद ठेवण्याचे जारी केले आहे.
या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.