छायाचित्र मतदार ओळखपत्राशिवायही करता येईल मतदान

0
14

• इतर 12 छायाचित्र ओळखपत्र मतदानासाठी ग्राहय
भंडारा दि.22:- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ पोट निवडणुक2018 करीता मतदान 28 मे 2018 रोजी होणार आहे. ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र उपलब्ध नाही. अशा मतदारांना मतदान करण्यासाठी छायाचित्र मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त इतर छायाचित्र ओळखपत्र मतदान करण्यासाठी स्विकारण्यात येणार आहेत. अशा 12 छायाचित्र ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहिर केली आहे.
यामध्ये पासपोर्ट, वाहन परवाना, केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक उपक्रम आणि पब्लीक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले सेवा ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे फोटायुक्त पासबुक, पॅन कार्ड, आधारकार्ड, आरजीआई आणि एनपीआर यांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शनचे फोटोयुक्त दस्तावेज, खासदार, विधानसभा/विधान परिषद सदस्यांना शासनाकडून दिलेले ओळखपत्र तसेच निवडणूक आयोगाने प्रमाणित केलेले छायाचित्र मतदार स्लीप इत्यादी कागदपत्रे मतदान करताना ओळखपत्रे म्हणून स्विकारण्यात येतील. मतदारांनी छायाचित्र मतदार ओळखपत्र नसले तरी सदर यादीतील कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी केले आहे.