डव्वा येथील जलयुक्तच्या कामासह तालुक्यातील कामाची व्हावी सखोल चौकशी

0
8

गोरेगाव,दि.२३– दुष्काळाचा सामना करणाèया शेतकèयांसाठी आशेचा किरण असणाèया जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. काही कंत्राटदार हे मूळ कंत्राटदाराकडून पेटीकॉन्ट्रक्ट स्वरूपात काम विकत घेऊन तो निकृष्ट तयार करू लागल्याने कामाची गुणवत्ता राहिलेली नाही.तर अधिकारी आपला हिस्सा घेऊन गप्प राहू लागल्याने या योजनेलाही हरताळ फासले जाऊ लागले आहे.
गोरेगाव तालुक्यातील दवडीपार येथे गेल्यावर्षी तयार करण्यात आलेल्या तलावदुरुस्ती व नहरदुरुस्तीच्या कामात ज्याप्रमाणे निकृष्ट कामाची गुणवत्ता पाळण्यात आली तीच परिस्थिती सध्या काम सुरू असलेल्या डव्वा येथील ५२ लाख रुपयाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या डव्वा येथील कामात दिसून येत आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे उपविभाग गोंदिया अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील डव्वा येथील मामा तलाव पुनरुज्जीवन व बळकटीकरणासाठी गट क्रमांक ८७६ साठी ३९.०२ लाख रुपये व गट क्रमांक ६०१ करिता २०.२१ लाख ५२.२२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या कामाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.त्या कामाला सुरवात झाली असून या कामांतर्गत ज्या तलावाचे खोलीकरण कंत्राटदाराने जेसीबी मशिनच्या मदतीने केले आहे ते बघितल्यावर खोलीकरण झाले की सपाटीकरण अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्यातच या गावातील काही नागरिकांनी यासंबंधी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावातील राजकारणामुळे अभियंत्याला बळ मिळाले आणि खोलीकरण सपाटीकरणातच परावर्तित झाल्याची बाब सदर कामाच्या ठिकाणी भेट दिल्यानंतर बघावयास मिळाले.त्यातच या तलावाच्या कालव्याचे काम सुद्धा सुरू करण्यात आले आहे.त्या कामात सुद्धा पाहिजे तशी गुणवत्ता दिसून येत नाही.कारण ज्या व्यक्तीला हे काम देण्यात आले आहे, तो राज्यातील सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असल्याने अधिकारी त्याला काहीही न बोलता चोर चोर मौसेरे भाई सारखी स्थिती तयार करून गप्प बसले आहेत.त्यातच काही पीडित शेतकरी सुद्धा या कामाबद्दल नाराज असून गावातील ग्रामपंचायतीचा एक पदाधिकारी त्यांना अभियंता माझा नातेवाईक आहे तुम्ही काय करून घेणार असे सांगत त्या निकृष्ट काम करणाèया कंत्राटदार व अभियंत्याला पाठबळ देत असल्याची चर्चा गावात एैकावयास मिळाली.त्यामुळे डव्वा येथील या तलावाच्या सर्व कामाची निष्पक्ष चौकशी इतर विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यामार्फत करण्याची वेळ आली आहे. गोरेगाव तालुक्यातील सर्वच गेल्या दीड दोन वर्षात झालेल्या कामाची सखोल चौकशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्यास अभियंत्यांचा चांगलाच काळाव्यवहार उघडकीस येणार असून जे कंत्राटदार ई निविदेच्या माध्यमातून कंत्राट घेतात मात्र स्वतः काम न करता ते काम इतराला विकत असल्याचा प्रकारही मुकाअ दयानिधी यांच्या समोर उघडकीस येईल यात शंका नाही.