मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई

0
10

मतमोजणी होणार सामाजिक न्याय भवनात
गोंदिया,दि.२३ : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे. मतदाराने मतदान केल्याची ओळख म्हणून या निवडणूकीच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावण्यास भारत निवडणूक आयोगाने मंजूरी दिली आहे. या निवडणूकीची मतमोजणी ३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन भंडारा येथे सकाळी ८ वाजतापासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही गोंधळ तसेच अप्रिय घटना होवू नये म्हणून कडक सुरक्षा बंदोबस्त राहणार आहे. तरी याबाबत सर्व मतदारांनी नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी भंडारा/गोंदिया यांनी कळविले आहे.