पत्रकारांनी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी लिखाण करावे – धीरजकुमार कांबळे

0
11
बिलोली,दि.23(सय्यद रियाज)ः-  आपल्या बिकट परिस्थितीवर मात करत जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या बळावर  प्रशासकीय सेवेत विभागीय सीमाशुल्क अधिकारी या पदावर रुजू  झालेल्या धीरजकुमार कांबळे यांचा सत्कार बिलोली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात करण्यात आला.यावेळी त्यांचे सहकारी व्ही.डब्लू मोहपेकर,जि. डी शेट्टीवार,व्ही. पी पालिमकर,कुमार गौरव या सर्वांचा पत्रकार बांधवांच्या वतीने शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
आपले मनोगत व्यक्त करतांना कांबळे म्हणाले की, मी याच मराठवाड्याच्या मातीत जन्मल्यामुळे मला या मातीचा आदर आहे.पत्रकारांनी पीडित शोषित समाजसोबतच   विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भाविष्यासाठी लिखाण करावे एक सामाजीक बांधिलकी म्हणून त्यांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे सूतोवाच ही केले. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णाई पुरस्कार प्राप्त राजेंद्र कांबळे,भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा नेते मारोती भदरगे,पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील कदम,रत्नाकर जाधव, जेष्ठ पत्रकार माधव एडके,दिलीप घाटे,यादव लोकडे,मारोती भालेराव,इंडियन पँथर प्रमुख संविधान दुगाने,पंढरीनाथ गायकवाड,विजय सोनकांबळे,बसवराज वाघमारे,गौतम लंके,देविदास भालेराव,प्रल्हाद वाघमारे,लोकस्वराज्य आंदोलनाचे कार्याध्यक्ष लालबा गोनेकर,मारोती सिंत्रे,शिवराज भालेराव,गौतम वाघमारे व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले तर आभार मारोती भदरगे यांनी मानले.