अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या सदस्यपदी भागवत देवसरकर

0
9
नांदेड,दि.24ः-अखिल भारतिय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड च्या वतिने दरवर्षी मोठ्या उत्साहात 5 व 6 जुन रोजी किल्ले रायगड येथे कोल्हापुर चे युवराज खासदार संभाजी छञपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.रायगड येथिल शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या नियोजनाच्या अनुषगांने पुणे येथे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक युवराज संभाजी छञपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सांवत,कार्याध्यक्ष हेंमत साळुंखे,विकास पासलकर,शांताराम कुंजिर यांच्या प्रमुख उपश्थितीमध्ये संपन्न झाली.यावेळी बैठकीत शिवराज्यभिषेक महोत्सव समितीच्या सदस्यपदी भागवत देवसकर यांची निवड करण्यात आली,नांदेड जिल्हामध्ये जिल्हाभर 5 व 6 जुन रोजी रायगड येथे आयोजित शिवराज्यभिषेक सोहळ्याचा कार्यक्रमाचा प्रसार,प्रचार,सभासद नोदंनी फार्म,नियोजन आढावा बैठक,समितीच्या वतिने नांदेडला पञकार परिषद,आदी नियोजनाची जवाबदारी भागवत देवसकर यांच्याकडे देण्यात आली आहे.