विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल

0
10

गोंदिया,दि.24 : आमचे सरकार सत्तेवर आल्यास गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विकास कामे करु,असे आश्वासन केंद्र व राज्यातील सत्तारुढ सरकारने दिले होते. मात्र मागील चार वर्षांत या दोन्ही जिल्ह्यात एकही ठोस सांगण्यासारखे विकास काम झाले नाही. लोकांना केवळ अच्छे दिन स्वप्ने दाखवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे विकासाच्या नावावर खोट्या गप्पा मारणाऱ्यांना जनताच नक्कीच धडा शिकवेल असे प्रतिपादन आ. राजेंद्र जैन यांनी येथे केले.
भंडारा- गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि. पा. पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील कोचेवाही, बनाथर, वडेगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी ओमप्रकाश भक्तवर्ती, सुखदेव गुप्ता, प्रेमलाल टेंभरे, चैतराम पटले, तेजलाल पटले, रेखलाल राऊत, सतीश बिसेन, अंकित बिसेन, माधोसिंह परिहार, हरसिंग जतपेले, देवेंद्र बागडे, तोपसिंग बुदले, प्रदीपसिंह चव्हाण, राजेश माने, अशोक बर्वे, धनंजय गुप्ता, मेहतरलाल तेलसे, गणेश मरठे, सिताराम नेवारे, दिनेश मरठे, प्रेमलाल दिवेवार, साहेबलाल खरे, हरूलाल अडमे, दीपक बर्वे, किसन खरे, धनराज हिरवाने, पवन तेलसे, मुलचंद तेलसे, अशोक नेवारे, भारत लांजेवार, प्रणय सोनी, हनस बर्वे, गजेंद्र शेंद्र, रुपलाल पाचे, छेदीलाल पाचे, हेमराज देशकर उपस्थित होते. जैन म्हणाले, सत्तारुढ सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. महागाईच्या दरात वाढ झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सरकार सर्वच गोष्टीत फेल झाले आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.