भाजपाशी लढायचे तर विकासाच्या मुद्यावर लढा- रावसाहेब दानवे पाटील

0
27
गोंदिया,दि.२४ः-जो माणूस भाजपच्या अधिवेशनात मोदीजी व मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयाचे स्वागताचे ठराव घेतो, तो तीन महिन्यातच कसा बदलतो जनतेला हे कळले असून जनताच या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. भाजप सरकार हे शेतकरी हिताचे असून जातीवादी नाही. ‘सबका साथ, सबका विकासङ्क या ब्रिदवाक्याला घेऊन देशात सर्व घटकांसाठी विकासाच्या योजना आणल्या गेल्या असून सर्वत्र परिवर्तन घडत आहे. मात्र विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहे. ६८ वर्ष काहीच न करणारे चार वर्षाचा हिशोब मागतात. मी काँग्रेसला आव्हान करतो की त्यांनी आमच्यासोबत लढायचे असेल तर विकासाच्या मुद्यावर लढावे, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.
ते तालुक्यातील दवनीवाडा येथे बुधवारी २३ मे रोजी भाजपाचे उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते. या वेळी प्रामुख्याने विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, उमेदवार हेमंत पटले, आ. विजय रहांगडाले, आ. सुधाकर कोहले, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, माजी आ. केशवराव मानकर, भजनदास वैद्य, भेरसिंह नागपुरे, हरीश मोरे, रमेश कुथे, अनुसूचित जाति आघाडी प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, सीताबाई रहांगडाले, सभापती शैलजा सोनवाने, छायाताई दसरे, गुड्डू लिल्हारे, मदन पटले, धनेंद्र अटरे, सुरेश पटले, महेंद्र बघेले आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी हाडाचा शेतकरी असून वयाच्या १९ व्या वर्षापासून समाजकारणात आहे. भाजपाने शेतकèयांसाठी मोर्चे, आंदोलन करून तुरूंगवास सोसला. २०१४ मध्ये जनतेने काँग्रेसचे सरकार उखडून फेकले. आज देशात राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यासह २१ राज्यात भाजपचे सरकार आहे. ही खरी जनतेची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर ब्रिटीशकालीन आणेवारी, पीक विमा पध्दत बदलून युरियाचा काळाबाजार संपविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, शेतकèयांना दीड लाख रुपयांपर्यंत राज्यात सरसकट कर्जमाफी केली. मागेल त्याला शेततळे, विहीरी, वीजपुरवठा, जलयुक्त शिवार योजना आणून qसचनाच्या रखडलेल्या सर्वच प्रकल्पांना निधी देऊन शेतकèयांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. रस्त्याचे जाळे व qसचनाच्या प्रकल्पांमुळे नितीन गडकरी यांनी विदर्भच नव्हे तर संपूर्ण देशात नवचैतन्य निर्माण केले आहे. सत्तेत असताना काँग्रेस हे करू शकले काय, हे त्यांनी सांगावे.यावेळी आ. विजय रहांगडाले, हेमंत पटले आदींनी मार्गदर्शन केले. सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.