लाखनी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा

0
9
लाखनी,दि.25ः- नगरपंचायतीची अध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आणि पुढील अडीच वर्षांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज घेण्यात आलेल्या  निवडणुकीत भाजपाच्या ज्योती निखाडे आणि उपाध्यक्षपदी माया निबेंकर विजयी झाल्या.
भाजपाकडे प्रत्यक्ष ६ नगरसेवक असतांना सत्तेत येण्यासाठी जुळवाजुळव करीत नगरपंचायतवर झेंडा रोवला. यात आमदार बाळा काशिवार आणि आमदार डॉ परिणय फुके यांनी विशेष प्रयत्न केले.लाखनी विकासविचार मंच या आघाडीचे दोन नगरसेवक विक्रम रोडे आणि सौ सुशीला भिवगडे भाजपात प्रवेश घेतला या प्रवेशामुळे भाजप लाखनीत अधिक बळकट झाला. भाजप पक्षाचे ६ नगरसेवक, काँग्रेस पक्षाचे ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवक आणि लाखनी विकास आघाडीचे २ नगरसेवक होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूकीत ज्योती निखाडे, माया निंबेकर,कल्पना भिवगडे,गीता तितीरमारे यांचे अध्यक्ष पदासाठी नामांकन होते. यापैकी भाजपच्या ज्योती निखाडे यांना ९ तर गीता तितीरमारे यांना ८ मते मिळाली. उपाध्यक्षपदी माया निंबेकर यांना ९ तर गिर्हेपुंजे यांना ८ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपाली जांभुळकर यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत सौ ज्योती निखाडे यांना पहिली पसंती दिली.