मुख्य बातम्या:

पालघरमध्ये पैसे वाटप करणाऱ्याला शिवसैनिकांनी पकडले रंगेहात, भाजपा शहराध्यक्षांवर आरोप

पालघर,दि.25 – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले असून, पालघरमधील ग्रामीण भागात मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला शिवसैनिकांनी रंगेहात पकडले आहे. पालघरमधील रानशेत भागामधून शिवसैनिकांनी पैशाचे वाटप करणाऱ्याला पकडले असून, भाजपा शहराध्यक्ष अशोक आंबोरे यांनी आपल्याला पाठवल्याची कबुली सदर तरुणाने प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घोडा उपस्थित होते.

Share