विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू

0
9

अकोला,दि. 26 :- : नजीकच्या आदिवासीबहुल गाव भिली येथील ५० वर्षीय आदिवासी शेतमजुराचा चितलवाडी शिवारातील शेतामधील निंबाच्या झाडाची फांदी तोडत असताना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार, २६ मे रोजी सकाळी १० वाजता घडली.
भिली येथील ५० वर्षी पांडू शिकलू बिबा हा शेतमजुर सकाळी चितलवाडी शेतशिवारातील रुपराव बळीराम इंगळे यांच्याकडे शेतामधील निंबाच्या झाडाच्या फांद्या छाटण्याकरिता मजुरीने गेला होता. निंबाच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना झाडावरून गेलेल्या ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीला त्याचा स्पर्श झाला. यावेळी त्याला विजेचा जोदार झटका बसला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी १० वाजता घडली. त्याच्यासोबत दुसरा मजुर खाली फांद्या छाटत होता. हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमकरिता तेल्हारा येथे पाठविला. या घटनेचा तपास ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात एएसआय असलम पठाण व पोकॉ. नीलेश बोरकुटे करीत आहेत.
मृतकाच्या मागे पत्नी, ६ मुलेमुली असा आप्त परिवार आहे. पांडु बिबा यांच्या मृत्युने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कमावता व्यक्ती मृत्यु पावल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत व्हावी, अशी मागणी आदिवासी गावकऱ्यांकडून होत आहे.
निंबाच्या झाडावरून ११ केव्ही विद्युत वाहिनी गेल्यामुळे झाडावर चढून फांद्या का तोडल्या, अशी चर्चा मृतकाचे नातेवाइक व आदिवासी गावकरी घटनास्थळावर चर्चा करीत होते.