ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोष-पटोलेंचा पत्रपरिषदेत आरोप

0
11

भंडारा,दि.26ः भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 28 मे रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार्या ईव्हीएम तसेच प्रथमच लोकसभा निवडणुकीत वापरात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनमध्ये दोष असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश कॉंँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेतून केला आहे.निवडणुक विभाग योग्यप्रमाणे काम करीत असून मशीनतपासणीच्यावेळी अनेक दोष समोर आल्याचे सांगत निवडणुक विभागाने पारदर्शकपणे ही निवडणुक घ्यावी असे आवाहन केले आहे.

घड्याळ चिन्हावर बटन दाबल्यास मशीन हँग होत असल्याचे देखील त्यांनी म्हटले अाहे. नियमाप्रमाणे १० मशीन तपासण्याची मुभा आहे. मात्र त्याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी केवळ ते सांगतील त्या मशीन तपासा असे सांगितल्याचे पटोलेंनी सांगितले. तसेच ईव्हीएम मशीनची तपासणी केली असता २८ मत दिल्यांनतर मतमोजणीत ते २९ मत निघाले. सोबतच व्हीव्हीपॅट मशीन मधून ४९ रिसिप्ट निघाल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात तेथील अभियंत्याला विचारणा केल्यावर जास्त उष्णतेमुळे असे झाल्याचे सांगितल्याने व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पटोले यांनी भाजप सरकार ही निवडणुक जिंकण्यासाठी काहीही करु शकते असा आरोप करीत आम्ही असा प्रकार होऊ देणार नसल्याचे म्हणाले. त्याकरीता निवडणुक आयोगाने निर्धारित केलेल्या नियमाप्रमाणे हि निवडणूक घ्यावे असेही पटोले पत्रपरिषदेत म्हणाले.