मुख्य बातम्या:
जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत २७ ऑगस्ट रोजी# #पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण# #'अटल' नेता हरपला : वाजपेयींचे 93 व्या वर्षी निधन# #अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच, मोदी अन् अमित शहा पुन्हा रुग्णालयात# #राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ख्वाजा बेग# #राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या कार्यकर्त्यांचे डिग्री जलाओ आंदोलन# #युवा माहिती दूत शासन व समाजामधील दुवा – ना. महादेव जानकर# #देवरी तालुक्यातील डोंगरगावला वादळाचा तडाखा# #अटल विश्वकर्मा सन्मान योजनेतंर्गत ३३ हजार कामारांची नोंदणी# #राजनांदगांव में नक्सलियों के किया आईईडी ब्लास्ट

शिकारी व ट्रॅक्टर वनविभागापासून लांबच

साकोली,दि.27 : वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
२५ मे रोजी दुपारी वलमाझरीच्या जंगलात एका रानगव्याची विद्युत प्रवाहाच्या सहाय्याने शिकार करून मृत रानगवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणून फेकल्याची घटना उघडकीस आली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्या रानगव्याला तिथेच खड्डा खोदून पुरण्यात आले.
या घटनेला तब्बल दोन दिवसाचा कालावधी लोटला असला तरी रानगव्याची शिकार करणारे व शिकारीनंतर या रानगव्याला ज्या ट्रॅक्टरने सोडण्यात आले त्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यास वनविभागाला अपयश आले आहे.

Share