मुख्य बातम्या:

राज्यात 52 नवीन फार्मसी महाविद्यालये सुरू होणार

पुणे ,दि.27- औषधनिर्माणशास्त्रात (फार्मसी) पदविका आणि पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राबविणारी देशात 393, तर राज्यात 52 नवी महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) या महाविद्यालयांना मंजुरी दिल्याने देशात यातील पदविका अभ्यासक्रमातील 17 हजार 460 जागा, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील नऊ हजार 298 जागा नव्याने उपलब्ध होणार आहेत.देशात 2018-19 या शैक्षणिक वर्षात औषधनिर्माणशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम राबविणारी 291 महाविद्यालये, तसेच पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची 102 महाविद्यालये नव्याने सुरू होणार आहेत. राज्यात पदविका अभ्यासक्रमांसाठी 32 महाविद्यालये, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी 20 महाविद्यालये सुरू करण्यासाठी परिषदेने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात एकूण जागांमध्ये पदविका अभ्यासक्रमासाठी एक हजार 920, तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी दोन हजार 160 जागांची वाढ होणार आहे, त्यामुळे राज्यात आता 437 औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये असणार आहेत.

Share