मुख्य बातम्या:

धरणात बुडून चार मित्रांचा मृत्यू

अमरावती,दि.27 – अचलपूर तालुक्‍यातील वज्झरस्थित सापन धरणात पोहायला गेलेल्या चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना (दि. 25) दुपारी घडली. दरम्यान यातून एक युवक सुदैवाने बचावला.वज्झरच्या सापन धरणाच्या पायथ्याशी धामणीकडे जाणाऱ्या पुलाजवळून काही अंतरावर नदीपात्रात एक जुना डोह आहे. या ठिकाणी संतोषनगर, परतवाडा येथील चंद्रशेखर चव्हाण, कांडली येथील दीपेश खराटे, अक्षय ढोरे, सागर चंदेलकर व धोतरखेडा येथील आतिष नरपते हे पाच जण पोहायला गेले होते. सर्वांनी नाश्‍ता केल्यानंतर चंद्रशेखर, दीपेश, अक्षय व सागर हे डोहात अंघोळीला उतरले. नरपते याला पोहता येत नव्हते, त्यामुळे त्याने उतरण्यास नकार दिला. त्यानंतर इतर चौघे एकमेकांचे हात पकडून डोहात शिरले आणि बुडाले.दरम्यान, नरपते याने बचावासाठी आरडाओरड केला; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. परतवाड्यातील प्राणिमित्र सुरमा भोपालीच्या मदतीने चारही मृतदेह डोहाबाहेर काढण्यात आले आहेत.हे सर्व युवक 30 ते 32 वर्षे वयोगटातील असून, ते बांधकाम मिस्त्री व्यवसाय करायचे, अशी माहिती पोलिसांनी दि

Share