रानडुकराच्या हल्ल्यात बिलोली येथील शेतमजूर ठार

0
19
बिलोली,दि.29ः- शहरातील देशमुख नगर येथील शेतमजूर   माधवराव नागोबा ईबितवार  वय ७0  यांच्यावर दि 27 मे रविवार दुपारी 3 च्या सुमारास  पवनकर नर्सीग मक्काजी यांच्याशेतात  काम करुन घराकडे येत  असताना बळवंते संभाजी यांच्या शेताजवळ रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. यात माधवराव ईबितवार  हे गंभीर जखमी झाले होते .
जखमी झालेले  ईबितवार यांच्या आरडाओरड्याने शेजारील शेतात काम करीत असलेले शेतकरी जोरजोरात ओरडत आल्याने डुकराने तेथून पळ काढला. यावेळी शेतक-याच्या  मदतीने गंभीर जखमी झालेल्या ईबितवार यांना  बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.  त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता . त्यांचा दोन दिवसा पासून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दि. 29 मे मंगळवारी  त्यांचा दुपारी मुत्यू झाला .  रान डूक्कराच्या हल्लात जिव गेला  असून यामुळे शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे.