राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे चौथ्या फेरीअखेर पाच हजाराने आघाडीवर

0
10

गोंदिया/भंडारा,दि.31ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकरीता झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला भंडारा येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात कडेकोट बंदोबस्तात सुरु झाली आहे.तिसरी फेरीची मतमोजणी होऊनही प्रशासनाकडून अद्यापही आकडेवारी जाहीर करण्यास प्रशासन असमर्थ ठरले आहे.त्यामुळे खरी आकडेवारी कुठली समजावी याबद्ल असमंज निर्माण झाला असून वेगवेगळ्या आकड्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.चौथ्याफेरी अखेरपर्यत राष्ट्रवादीचे उमेदवार 50910 मतानी आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादीचे उमेदवार कुकडे हे तिरोडा विधानसभा मतदारसंघ वगळता सर्वच मतदारसंघात 100-200 मतांनी आघाडीवर दिसून येत आहेत.तर तिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदावर हेमंत पटले हे आघाडीवर दिसून येत आहेत.कुकडे यांनी 14253 मते मिळाली आहेत तर हेमंत पटले यांना 11233 मते तिसर्याफेरीअखेर मिळाली आहेत.

पहिली फेरीत उमेदवारांना मिळालेली मते खालीप्रमाणे-
१) मधुकर कुकडे- 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस)
2)हेमंत पटले- 17246  (भारतीय जनता पार्टी)
3) अक्षय पांडे- 195(विदर्भ माझा पार्टी)
4)गोपाल उईके 150 (गोंडवाना गणतंत्र पार्टी)
5) डॉ.चंद्रमणी कांबळे- 101 (आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया)
6)जितेंद्र राऊत- 54 (अखिल भारतीय मानवता पार्टी)
7)धरमराज भलावी- 139 (बहुजन मुक्ती पार्टी)
8) नंदलाल काडगाये- 120 (बळीराजा पार्टी)
9)राजेश बोरकर- 119 (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी)
10)एल.के.मडावी- 778 (भारिप बहुजन महासंघ)
11)अजबलाल तुलाराम- 333 (अपक्ष)
12) किशोर पंचभाई- 49 (अपक्ष)
13)काशीराम गजबे- 445 (अपक्ष)
14)चनीराम मेश्राम- 68 (अपक्ष)
15) पुरुषोत्तम कावळे- 142 (अपक्ष)
16)राकेश टेभरे- 329 (अपक्ष)
17)रामविलास मस्करे- 448 (अपक्ष)
18) सुहास फुंडे-. 356 (अपक्ष)
NOTA-226 एकूण-39326