पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप माघारला

0
6
गोंदिया,दि.31- केंद्र व राज्यात सत्ता असताना आणि केंद्रियमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री बावनकुळे आणि पालकमंत्री यांनी प्रचाराचा धुराळा उडविल्यानंतरही भाजपचे उमेदवार हेमंत पडले यांना विजयासाठी अक्षरशः झगडावे लागत असल्याचे चित्र मतमोजणीनंतर बघावयास मिळत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या भंडारा लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी प्रशासनाच्या वतीने आकडेवारी जाहीर न करणे आणि पत्रकारांना पासेस असून सुद्धा करण्यात आलेला मज्जाव अनाकलनीय आहे. महत्वाचे म्हणजे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ईव्हीएम घोटाळा समोर आला होता. या प्रक्रियते निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सुद्धा संशय व्यक्त करीत त्यांचेवर निवडणुक आचारसहिंता भंग केल्याचा आरोप आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी ईव्हीएम आणि प्रशासकीय कार्यवाहीवर आरोप केला होता. निवडणुक प्रक्रिया सुरू असताना शेतकऱ्यांना केलेल बोनसचे वाटप यात शासकीय यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे भाजपचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पक्षाच्या वतीने प्रचंड राळ उठविण्यात आली होती. राज्याचे उर्जामंत्री बावनकुळे तर या मतदार संघात तळ ठोकून होते. त्यांनी एकूण 50 सभा गाजविल्या. केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांनी 4 सभा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 सभा घेतल्या. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार यांचा जिल्हा असल्याने त्यांनी प्रचारात आपला जीव झोकून दिले होते. असे असताना मतदानाच्या वेळी या मतदार संघात तिरोडा मतदारसंघ वगळता भाजप माघारल्याचे दिसत आहे. मोरगाव अर्जूनी या पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात तर पक्षाची वाईट स्थिती आहे.