राष्ट्रवादीच्या कुकंडेची विजयाकडे वाटचाल 24 हजाराने आघाडीवर

0
16

गोंदिया,दि.31 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी विजयाकडे वाटचाल सुरु केली आहे.आत्तापर्यंत आटोपलेल्या 21 फेरीपर्यंत कुकडे हे भाजप उमेदवार हेमंत पटले यांच्यापेक्षा 24 हजार मतानी आघाडी घेत समोर आहेत.त्यामुळे त्यांचा विजय पक्का समजून कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली आहे.नाना पटोले यांनी राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती.

विशेष म्हणजे भाजपच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री,प्रदेशाध्यक्ष,केंद्रीयमंत्र्यासह राष्ट्रीय प्रवक्ते,आमदार खासदारांच्या जाहिरसभांचे आयोजन करण्यात आले होते.तर काँग्रेसकडून एकटे माजी खासदार नाना पटोले यांनीच या निवडणुकीत खिंड लढविली.राष्ट्रवादीच्यावतीने प्रफुल पटेल,जंयत पाटील,धनंजय मुंडे,अजित पवार व अनिल देशमुख,वर्षा पटेलांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.मात्र राष्ट्रवादीच्या प्रचारासारखे वाटत नव्हते.त्यातच नाना पटोलेंसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असल्याने त्यांनी भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात आपल्याला झोकून दिले होते त्याचे परिणाम निकालातून समाेर आले आहेत.

पहिल्या फेरीत मधुकर कुकडे यांना 18028 (राष्ट्रवादी काँग्रेस) तर हेमंत पटले यांना 17246(भाजप) मते मिळाली.दुसर्या फेरीमध्ये कुकडे यांना 35512 व पटले यांना 33306 मते. तिसरी फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 51219,भाजपचे हेमंत पटेल यांना 48382 मते, चौथ्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना ६७०६१ हजार मते,भाजपचे हेमंत पटले यांना ६४००७,बळीराजा पार्टीचे नंदलाल काडगाये यांना ३६९,भारीपचे एल.के.मडावी यांना ४८८२ मते मिळाली आहेत.पाचव्या फेरीमध्ये मधुकर कुकडे यांना ८५१६०,भाजपचे हेमंत पटले यांना ८०१३१,बळीराजा पार्टीचे नंदलाल काडगाये यांना ३९८ तर भारीपचे एल.के.मडावी यांना ६४०६ मते मिळाली आहेत.सहाव्या फेरीत मधुकर कुकडे यांना १०२७५५ मते ,भाजपचे हेमंत पटले यांना ९४८६८ मते,बळीराजा पार्टीचे नंदलाल काडगाये ४३६,भारीपचे एल.के.मडावी यांना७६०२ मते,अपक्ष राकेश टेंभरेला १७८४ मते,बीआरएसपीच्या राजेश बोरकला १३०० मते मिळाली.

सातव्या फेरीत मधुकर कुकडे यांना 121025  मते ,भाजपचे हेमंत पटले यांना 110739 मते ,आठव्या फेरीत 140285 कुकडे यांना,तर भाजपच्या पटलेंना 126416,नवव्या फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 156680 तर भाजपचे पटले यांना 142998, दहाव्या फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 173856 तर भाजपचे पटले यांना 157744 ,अकराव्या फेरीत राष्ट्रवादीचे कुकडे यांना 192010 तर भाजपच्या पटलेंना 172024 मते मिळाली