नाना पटोलेंचा फडणवीस-गडकरींना ‘दे धक्का’!;राष्ट्रवादीचा विजय

0
20

गोंदिया,दि.31ः- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी- काँग्रेस रिपाई आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांना पराभूत केले. सुरूवातीच्या पाच-सहा फेरीपर्यंत कुकडे आणि पटले यांच्यात चांगलीच चुरस पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर मधुकर कुकडे यांनी सातत्याने आघाडी घेत विजयाकडे आगेकूच केली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार एल. के. मडावी हे तिस-या स्थानावर राहिले. पाहिजे तसे मतदान झाले नाही,बीआरएसपीलाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही.विशेष म्हणजे भाजपच्या सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्र्यापासून केंद्रीय मंत्री,प्रदेशाध्यक्ष,मंत्र्यानी व खासदार,आमदार व उमेदवारांनीही नाना पटोलेंवरच आपल्या भाषणातून टिकेची झोड उठवली होती.मात्र या निवडणुकीत नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेलांच्या सहकार्याने भाजपच्या या नेत्यांना चांगलाच धक्का देण्यात यशस्वी झाले आहेत. भंडारा-गोंदियातील पराभवामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विदर्भातील वर्चस्वाला घरघर लागल्याचे मानले जात आहे.गोरखपूर टू गोंदिया असा हा निकाल असल्याची काहींनी प्रतिक्रिया सुद्दा व्यक्त केली आहे.कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष दोन्ही जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जात आहे.