अंनिसचे कमलाकर जमदाडेना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार प्रदान

0
16
बिलोली (सय्यद रियाज ),,दि.31ः-   अंबाबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था लातूर यांच्याकडून दिला जाणारा यंदाचा जनसेवा पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र झटणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील कमलाकर जमदाडे यांना देण्यात आला. हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचे विविध उपक्रम,हिवाळ्यात गोर गरिबांना निराधार लोकांना वस्त्र वाटप,गावामध्ये लोक सहभागातून वाचनालयाची स्थापना,विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,मुलीचा वाढदिवस कधी स्मशान भूमीत तर कधी रुग्णासोबत साजरा करणे,जादूटोना विरोधी कायद्याचा जिल्हाभरात प्रचार प्रसार असे विविध उपक्रम ते राबवितात.त्यांच्या या कार्याचा आढावा घेत यापूर्वी त बहुजन टायगर सेना या सामाजिक संघटनेकडून समाजभूषण पुरस्कार,मानव विकास प्रतिष्ठाण तर्फे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार,रेड क्रॉस सोसायटी नांदेड कडून उत्कृष्ट रक्तदाते पुरस्कार या बहुरूपी पुरस्काराने यापूर्वी त्याना गौरविण्यात आले होते.
    लातूर येथील दयानंद सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवी कवियत्री यांच्या कवितांचे वाचन,त्यानंतर महाराष्ट्रभरात ज्ञान दानाचं काम करणाऱ्या शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी २१ शिक्षक -शिक्षकांना ज्ञानतीर्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन दयानंद बिराजदार यांनी केले होते.
      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कमिटीचे लातूर  जिल्हा अध्यक्ष ऍड. व्यंकट बेंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सूर्यनारायण रनसुबे,तहसीलदार प्रताप वाघमारे,पृथ्वीराज शिरसाट,रामदास वाघमारे,महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे,सौ.मीरा वाघमारे,गोपाळ सूर्यवंशी,पुण्यनगरीचे जेष्ठ वृत्त संपादक जयप्रकाश दगडे,विलासराव देशमुख युवामंच लातूर चे शहराध्यक्ष सत्यनारायनजी वडे,सुडे सर, आनंद घोडके,सरस्वती बिराजदार,भारीपचे जिल्हा नेते मारोती भदरगे,इंडियन पँथर प्रमुख संविधान दुगाने,भास्कर भेदेकर,इंजि. सम्राट हटकर,डॉ. श्याम नलगोंडे,सामाजिक कार्यकर्ते मिथुन नलगोंडे उपस्थित होते.