डॉ सुहास वारके नांदेडचे विशेष पोलिस महानिरीक्षक

0
11

नांदेड,दि.31- दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख डाॅ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची औरंगाबाद येथे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली व ते तेथे रूजू ही झाले आहेत. काल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून मुंबईत कार्यरत असलेल्या डाॅ. सुहास वारके यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती चे आदेश निघाले. तुरूंग विभागाचे पोलिस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव यांची नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती अपेक्षित धरली जात होती.परंतु ऐनवेळी जाधव यांच्या ऐवजी वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नांदेड चे भुमिपुत्र तथा मुंबई येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलिस आयुक्त रावसाहेब शिंदे यांची पुणे येथे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.