राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे 48 हजार मतांनी विजयी

0
18

भंडारा,दि.31: मतदान यंत्रातील बिघाडामुळे गाजलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे 48097 हजारा मतांनी विजयी झाले. आज (गुरुवार) मतमोजणी सुरू झाल्यानंतर अटीतटीची लढत पहायला मिळाली. अखेर मधुकर कुकडे यांनीच बाजी मारली.राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांना ४ लाख ४२ हजार २१३ तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत पटले यांना ३ लाख ९४ हजार ११६ मते मिळाली.त्यात 6602 नोटा मतांचाही समावेश आहे. तिसèया क्रमांकावर भारीप बहुजनमहासंघाचे एल.के.मडावी राहिले यांनी ४० हजार ३२६ मते मिळविली.या निवडणुकीत 9 लाख 48 हजार 849 मतांची मोजणी करण्यात आली. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुकडे यांच्या विजयाचा जल्लोष दोन्ही जिल्ह्यात फटाके फोडून साजरा केला.त्याचवेळी कुकडे हे आपले विजयी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेले असता मतमोजणी केंद्रावरील पोलीस अधिकार्यानी कुकडे यांनाच अटकवल्याने थोड्यावेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने पोटनिवडणूक झाली होती. भंडारा-गोंदियामध्ये तब्बल 18 उमेदवार रिंगणात होते. प्रामुख्याने राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात मुख्य लढत होती. मतमोजणी सुरू असताना सतत आकडे बदलताना दिसत होते. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता लागली होती.दरम्यान, भंडारा-गोंदिया मतदारसंघात बुधवारी पुन्हा 49 मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्यात आले होते. या मतदान केंद्रांवर जवळपास 40 हजार मतदार होते. त्यापैकी जवळपास 65 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाच्या दिवशीही अनेक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे ही निवडणूक मतदान यंत्रांमुळेच जास्त गाजली होती.इतर उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे  अक्षय पांडे 4312, गोपाल उइके (गोंडवाना) 2476,
डॉ चन्द्रमणी कांबळे (API) 1758,जीतेन्द्र राऊत 1191, धर्मराज भलावी (BMP) 1715,नंदलाल काड़गाये (बळीराजा) 1154, राजेश बोरकर (BRSP) 6362,L.K. मडावी (भारिप बम) 40,326,अजाबलाल शास्त्री(अपक्ष) 7453,किशोर पंचभाई 1963,काशीराम गजबे 8264,चनिराम मेश्राम 1644, पुरुषोत्तम कांबळे 2711, राकेश टेंभरे 6893,रामविलास मस्करे 9454 व  सुहास फुंडे 8103 मते मिळाली.

विधानसभा मतदारसंघनिहाय मते याप्रमाणे गोंदिया मतदारसंघ राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे – 63603 व भाजप हेमंत पटले – 65917,तुमसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी मधुकर कुकडे – 86313 व भाजपचे हेमंत पटले – 67431,मोरगाव अर्जुनी मतदारसंघ राष्ट्रवादी मधुकर कुकडे – 69217 व  भाजप हेमंत पटले – 56930,साकोली मतदारसंघ
राष्ट्रवादी मधुकर कुकडे – 88698 व भाजप हेमंत पटले – 73524,भंडारा मतदारसंघ राष्ट्रवादी मधुकर कुकडे – 68029 व भाजप हेमंत पटले – 71834, तिरोडा मतदारसंघ
राष्ट्रवादी मधुकर कुकडे – 65955 व भाजपचे हेमंत पटले यांना 58027 मते मिळाली.