राज्यात शेतकरी संपाला सुरवात..

0
15

पुणे,दि.01: राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातही शेतकरी संपास प्रारंभ झाला असून येथे अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. देशातील १३० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात काही शेतकरी संघटना यात सहभागी होणार नसून काहींनी आज धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या वर्षी १ जून रोजीच राज्यातील शेतकरी संपावर गेले होते व त्याची दखल सरकारला घ्यावी लागली होती. या संपकाळात शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणण्यास नकार दिला तर दूध उत्पादकांनी रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध केला होता. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यात हिंसक वळण लागल्याची घटनाही घडली होती. नंतरच्या काळात मात्र नाशिक हेच आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले होते. केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नावर फसवणूकच केल्याची भावना व्यक्त करीत आहेत.औरंगाबाद -कन्नड मार्गावर गल्ले बोरगाव येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून केला शासनाच्या धोरणाचा निषेध केले. औरंगाबाद येथे शेतकरी संपानिमित्ताने सकाळी 11 वाजता स्थानिक क्रांती चौकात क्रांती मशाल पेटविली जाणार आहे. लासुर स्टेशन परिसरातील पिंपळगाव येथे दूध वाटप होणार आहे.संपाची धार उद्या तीव्र होईल अशी माहिती विजय काकडे पाटील यांनी दिली. सांगली, सातारा, जळगाव, चाळीसगाव, परभणी बाजारसमित्यांमध्ये पहिल्या दिवशी तरी सर्व व्यवहर सुरळीत सुरू राहिले.