क्रिकेट स्पर्धेत चुरडी संघ ठरला विजेता

0
5

तिरोडा,दि.02 : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे अदानी पॉवर प्लांट परिसरातील ग्रामपंचायती मधील युवकांसाठी भव्य दिवस -रात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत गुमाधावडा, खैरबोडी, काचेवानी, बेरडीपार, बरबसपुरा, मेंदीपूर, भिवापूर, गराडा, चुरडी, मलपूर, जमुनीया, खमारी, ठाणेगाव, चिरेखानी, कवलेवाडा आणि चिखली या गावच्या क्रिकेट संघानी सहभाग नोंदविला.
सदर स्पर्धा टाऊनशीप बेरडीपार येथील भव्य स्टेडीयम मध्ये आयोजित करून यशस्वी रित्या संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये क्रिकेट सामन्यांच्या उद््घाटनाप्रसंगी अदानी पॉवर प्लांटचे प्रमुख सी.पी. शाहू, सर्व विभाग प्रमुख गोंदिया जिल्ह्याचे उपनिबंधक संदीप जाधव तसेच संबंधित १६ ग्रा.पं.चे सरपंच, ग्रा. पं. सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चुरडी संघाने बेरडीपार संघावर विजय प्राप्त करून विजेता चषक तसेच १५ हजार रुपये रोख बक्षिस जिंकले. बेरडीपार संघाने उपविजेता चषक आणि ११ हजार रुपये रोख प्राप्त केले. स्पधार्वीर आणि सामना विराचा दुहेरी पुरस्कार चुरडी टीमचा कर्णधार रजत इश्‍वरकर याने पटकाविला. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज बेरडीपार संघाचा मोहित चौधरी तसेच उत्कृष्ट गोलंदाजचा मान बेरडीपार संगाच्या राजेश ठाकरे ठरला.
पुरस्काराचे वितरण तिरोडाच्याचे न.प. मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत अदानी पॉवर प्लांटचे प्रमुख सी. पी. शाहू, संबंधित गावाचे सरपंच तसेच अदानी पॉवरचे वरिष्ट अधिकारी यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अदानी पॉवर प्लांटचे विविध विभागातील अधिकारी, ग्रामस्थांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभार अदानी फाऊंडेशनचे विभाग प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले.