पर्यावरण दिनानिमित्त नातेपुतेत महिला मॅराथान

0
41

सोलापूर,दि.05ः- जागतिक पर्यावरण दिना निमित्त युगंधरा सखी मंच नातेपुते जि.सोलापूरच्यावतीने महीला मँरोथन स्पर्धा आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी राज्य व राष्ट्रीयस्तरावर कबड्डी खेळलेल्या महिला खेळाडूंना आमत्रिंत करण्यात आले होते.त्यातही या कार्यक्रमासाठी आमंत्रित तिन्ही महिला खेळाडू या आज वेगवेगळ्या पातळीवर त्यांचे कार्य सुरु असून सख्या मैत्रिणींची भेट यामाध्यमातून या कार्यक्रमात झाली आहे.या मॅराथान स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने आबालवृध्दांनी सहभाग नोंदविला.त्यानंतर शैक्षणिक संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्टृीय धावपट्टू शिवछत्रपती पुरस्कार विजेता तथा भंडारा जिल्हा क्रिडाधिकारी सौ.भाग्यश्री बिले,महाराष्टृ महिला कबडी संघाच्या कर्णधार शिवछत्रपती विजेती सौ.शोभाताई भगत आणि महाराष्ट्राच्या ऊत्कृष्ट महिला कबड्डी खेळाडू सौ.मिरा चिकणे-देशमुख उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी युगंधऱा सखी मंच नातेपुतेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह हरि चिकणे यांनी विशेष प्रयत्न केले.