सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध देशमुख गटाच्या ताब्यात          

0
19

बिलोली (सय्यद रियाज)दि.६ :  तालुक्यातील कार्ला खुर्द येथील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचे एकही फॉर्म न आल्याने येथील निवडणूक बिनविरोध झाली असून पुनःच देशमुख गटाच्या ताब्यात आली आहे .या बद्दल माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर व भीमराव जेठे यांनी बाबुराव देशमुख व त्याच्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले आहे. कार्ला खुर्द येथील  सोसायटी ची निवडणूक जाहीर झाल्याने बाबुराव देशमुख यांनी कार्ला खुर्द व बावलगाव येथील मतदार बैठक बोलावून सोसायटीची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आवाहन केले.विचार करून बावल गाव व कार्ला  येथील मतदारांनी 13 लोकांना निवडले.फॉर्म भरणाच्या शेवटच्या दिवशी बाबुराव देशमुख,राजेश्वर आरोळे,मंजुळाबाई     सुधाकररेड्डी,चंद्राबाई गंगोंडा, धनुरे नागुबाई सुभाष,बाबाराव रामचंद्र ठोंमसे, गंगाराम बाबाराव पाटील,सुरेश रामरेड्डी, शंकर लोखंडे, अशोक हणमंतराव,मदणुरे हणमंत दीपक गायकवाड, बालाबाई कुडकेकर  या 13 जणांनीच फॉर्म भरल्याने  बिनविरोध निवडून आले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून दत्ता पाटील, सुभाष पटणे, शंकरराव ठोंमसे,मोगलाजी गोंडा, किरण देशमुख, मिननाथ पाटील,शंकर आरोळे पुरुषोत्तम मुंडकर शंभू आरोळे आदींनी सहकार्य केले. निवडणूक अधिकारी म्हणून अनिल पाटील काम पाहिले त्यांना मठपती यांनी सहकार्य केले.  निवडणूक बिनविरोध झाल्यावर बाबुराव देशमुख व त्यांच्या सर्व संचालकाचा सत्कार माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे यांनी केला तर रावसाहेब अंतापुरकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.