कार्ला(बु.)वाळू घाटाची मुदत संपल्यानंतरही घाट सुरुच

0
11
बिलोली,दि.08(रियाज सय्यद)- तालुक्यातील कार्ला(बु.)वाळू घाटउत्खननासाठी दिलेली मुदत संपल्यानंतरही वाळू घाट जोमाने सुरु असतांनाही महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे याकडे झालेले दुर्लक्ष सदर ठेकेदारास अभय असल्याचे बोलले जात आहे.नागरिकांनी सदर कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागमी केली आहे. दिल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी समोर आली आहे.
   बिलोली तालुक्यातील कार्ला ( बु.) येथील वाळू घाटाच्या ठेकेदारास 1908 ब्रासची परवानगी 8 फेब्रुवारी 2018 रोजी देण्यात आली.शासन निर्णयाच्या नविन परीपञकानुसार 3000 ब्रास वाळु घाटाचे लिलाव 3 महीन्यासाठी आहे. तीन  महीन्याची मुदत देण्यात आली .असे असतांना कार्ला ( बु.) वाळू घाटाची मुदत 20 मे 2018 रोजी संपली असतांना सदर वाळू घाट अजुनपर्यंत दिवसराञ  सुरु असतांनाही महसुल विभाग माञ मुग गिळुन गप्प बसला आहे. ना वाळु घाट बंद झाला ना कार्यवाही झाली . चिरीमिरीच्या लालसेने अगदी बिनबोभाट कार्ला वाळु घाट चालु आहे. महसुल कर्मचाऱ्यांच्या अशा  वृत्तीने शासनाचा लाखोंच्या महसुलला चुना लागत असल्याने कार्ला (बु. ) वाळू घाट बंद करुन  ठेकेदारावर कार्यवाही करावी ठेकेदारास अभय देणाऱ्या महसुल विभागातील भ्रष्ट अधिकारी – कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी अशी मागणी सय्यद रीयाज , सुरेश देवकरे , मोहमद इलियास यांच्यासह अन्य दोघांनी बिलोलीचे नुतन तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.कार्यवाही नाही झाल्यास दि.9 जुन  रोजी कार्ला वाळु घाटावरच जेसीबी बंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदन कर्त्यांकडुन देण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांना भेटलेल्या शिष्टमंडळांनी महसुल यंञणेवर आमचा विश्वास राहीला नाही असे सांगत कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली.