जिल्ह्यात मुलींची दहावीच्या निकालात आघाडी

0
10

गोंदिया,दि.08ः- अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय रामेश्वर खोब्रागडे यांना ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर अवंती अजय राऊत हिने ९६.८०,निगम युवराज खोब्रागडे यांने ९६.६० टक्के गुण मिळवून पहिल्या तीनमध्ये स्थान पटकावला.गोंदिया तालुक्यातील काटी येथील सुकन्या हायस्कुलचा निकाल ९८.२० टक्के लागला असून हायस्कुलची विद्यार्थीनी श्रृष्टी राजेश बागडे हिने ८८.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.शाळेतून ४७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.

आमगाव विद्या निकेतन कनिष्ठ महाविदयालय देवरी रोड आमगांवची विद्यार्थीनी गौरी पवन कटरे हिने  96% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिचे अभिनंदन समाज कार्यकर्ता मुन्ना कटरे, एस डी पटले, भगतजी, राजु पटले, के.के. कटरे, रेखलाल टेम्भरे, खोमेश कटरे आदीने केले.शाळेचा निकाल 96.23 टक्के लागला असून 61 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले.186 पैकी 179 विद्यार्थ्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले.हिमानी चैतराम शेंडे तिगांव ता.आमगाव (गोंदिया)हिने 93.00% गुण प्राप्त करुन यश मिळविले.