गोंदिया जिल्हा दहावीच्या निकाला विभागात आघाडीवर

0
20
गोंदिया,दि.०८ः- जिल्ह्याने विभागात भरारी घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २२ हजार ६०३ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १९ हजार ७८९ म्हणजेच ८७.५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तर ३८२७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले आहेत.तर जिल्ह्यातील फक्त ३ शाळांचा निकाल ५० टक्केच्या खाली लागलेला आहे.१०० टक्के निकाल देणाèया ४४ शाळांचा समावेश आहे.अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती शाळेचा तन्मय खोब्रागडे यांनी ९७.२०टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
१०० टक्के निकाल देणाèया शाळामध्ये रqवद्रनाथ टागोर हायस्कुल रेलटोली गोंदिया,हरिराम अग्रवाल माध्यमिक विद्यालय रजेगाव,गुरुनानक इंग्लीश स्कुल लक्ष्मीबाई वार्ड गोंदिया,साकेत पब्लीक स्कुल गोंदिया,निर्मल इंग्लीश स्कुल रेलटोली गोंदिया,विवेक मंदीर हायस्कुल गणेशनगर गोंदिया,गणेशन कान्व्हेंट गोंदिया,जानकीदेवी चौरागडे हायस्कुल कुडवा,प्रोगेस्विह इंग्लीश हाय.गोंदिया,संत जयरामदास आदिवासी माध्य.आश्रमशाळा कामठा,qहदल माध्यमिक शाळा मुंडीपार,मनोहर पटेल सैनिक शाळा कुंडवा,श्री राजस्थान इंग्लीश हायस्कुल गोंदिया,संस्कार हायस्कुल गोंदिया,चंचलबेन मनीबेन हाय.गोंदिया,स्वामी टेऊराम आदर्श इंग्लीश स्कुल गोंदिया,लिटल फ्लावर स्कुल गोंदिया,शारदा इंग्लीश हायस्कुल गोंदिया,एक्युट पब्लीक स्कुल कटंगी,अनु.जाती व नवबौध्द मुलांची निवासी शाळा,प्रोगेसिव्ह मराठी शाळा गोंदिया,एसेंट पब्लीक स्कुल मुर्री रोड गोंदिया,चित्रांस अकादमी गोंदिया,मिqलद विद्यालय गोरठा,नत्थुजी पुस्तोडे अनु.माध्य.आश्रमशाळा देवलगाव,जी.एम.बी.हायस्कुल अर्जुनी मोरगाव,न्यु मुन इंग्लीश हायस्कुल गोंदिया,आदिवासी विकास राजर्षी विद्यालय कडीकसा,शासकीय माध्यमिक आश्रमशाळा ककोडी, श्री शंकरलाल अग्रवाल माध्य.विद्यालय फुक्कीमेठा,बिरसामुंडा माध्य.आश्रमशाळा कोसबंी,सिता पब्लीक स्कुल देवरी,स्व.ब्रिजलाल कटरे हायस्कुल शहारवानी,सरस्वती माध्यमिक विद्यालय घोटी,किरसान मिशन हायस्कुल गोरेगाव,किरसान इंटरनॅशनल हाय.गोरेगाव,मॉडेल कान्व्हेंट गोरेगाव,लोकमान्य तिलक विद्यालय कोकणा जमी,अनु.जाती आणि नवबौध्द मुलींची निवासी शाळा,आदिवासी उज्वल विद्यालय बिजेपार,शास.माध्यमिक आश्रमशाळा बिजेपार,शासकिय माध्य आश्रमशाळा जमाकुडो,ज्ञानदिप आदिवासी विकास हायस्कुल विचारपूर या शांळाचा समावेस आहे.
पंढरीबापू देशमुख विद्यालय, महागांव,ता.अर्जुनी मोरगावचा निकाल ९४.९० टक्के लागला असून विद्यालयातून  कु.युगाली मनोहर बाळबुध्दे ४६१ (९३.६०%),कु.सुहानी हरिभाऊ राऊत ४४० (८८%),कु.साक्षी रामदास शेंडे ४३८ (८७.६०%), कु.नलिना पांडुरंग सुकारे ४३७ (८७.४०%), भरत बाळकृष्ण गायकवाड ४३५ (८७%)यानी यश प्राप्त केले आहे.अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय रामेश्वर खोब्रागडे यांना ९७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.तर अवंती अजय राऊत हिने ९६.८०,निगम युवराज खोब्रागडे यांने ९६.६० टक्के गुण मिळवून पहिल्रया तीनमध्ये स्थान पटकावला.गोंदिया तालुक्यातील काटी येथील सुकन्या हायस्कुलचा निकाल ९८.२० टक्के लागला असून हायस्कुलची विद्यार्थीनी श्रृष्टी राजेश बागडे हिने ८८.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.शाळेतून ४७ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
आमगाव विद्या निकेतन कनिष्ठ महाविदयालय देवरी रोड आमगांवची विद्यार्थीनी गौरी पवन कटरे हिने  ९६% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.तिचे अभिनंदन समाज कार्यकर्ता मुन्ना कटरे, एस डी पटले, भगतजी, राजु पटले, के.के. कटरे, रेखलाल टेम्भरे, खोमेश कटरे आदीने केले.शाळेचा निकाल ९६.२३ टक्के लागला असून ६१ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत आले.१८६ पैकी १७९ विद्याथ्र्यांनी परिक्षेत यश प्राप्त केले.हिमानी चैतराम शेंडे तिगांव ता.आमगाव (गोंदिया)हिने ९३.००% गुण प्राप्त करुन यश मिळविले.