तन्मय व सलोनी जिल्ह्यात प्रथम

0
18

गोंदिया,दि.09ः-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी ८ जून रोजी दुपारी १ वाजता इंटरनेटवर जाहीर करण्यात आला. या परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने नागपूर विभागात पहिला क्रमांक पटकावला असून जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ८७.५५ इतकी आहे.
अजुर्नी-मोर येथील सरस्वती विद्यालयाचा तन्मय रामेश्‍वर खोब्रागडे व जीएमबी हायस्कूलची सलोनी योगेश पालीवाल यांनी ९७.२0 टक्के गुण घेऊन संयुक्तरित्या जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला. तसेच आमगाव येथील आदर्श विद्यालयाची ट्विंकल दयाराम बागडे व अजुर्नी-मोर येथील सरस्वती विद्यालयाचा प्रितीश घनश्याम मस्के यांनी संयुक्तरित्या ९७ टक्के घेऊन व्दितीय तर सरस्वती विद्यालयाचीच अवंती अजय राऊत हिने ९६.८0 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.अजुर्नी-मोर येथील सरस्वती विद्यालयाचा तन्मय रामेश्‍वर खोब्रागडे व जीएमबी हायस्कूलची सलोनी योगेश पालीवाल यांनी ९७.२0 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकाविला. या दोघांनाही भविष्यात अभियंता होऊन आयआयटी क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न घडवायचे असल्याने त्यांनी सांगितले. यात गोंदिया तालुक्यातील २३ विद्यालय, आमगाव १, अजुर्नी-मोर ३, देवरी ५, गोरेगाव ५, सडक अजुर्नी २, सालेकसा ४ विद्यालयांचा समावेश आहे. तालुकानिहाय टक्केवारीत ८९.९९ टक्के निकाल देऊन सडक अजुर्नी तालुका अव्वल ठरला असून गोंदिया ८८.३९, आमगाव ८६.४८, अजुर्नी-मोर ८८.५५, देवरी ८४.१२, गोरेगाव ८६.0३, सालेकसा ८९.१७ व तिरोडा तालुक्याचा निकाल ८६.५३ टक्के लागला आहे.