भंडारा-गोंदिया, कैरानामध्ये निवडणुकीदरम्यान EVMमध्ये या कारणामुळे झाला होता बिघाड

0
13

नवी दिल्ली,दि.09(वृत्तसंस्था)ः-उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियासहीत 10 जागांवर पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला होता.पराभवाच्या भीतीनं भाजपानं ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोपही विरोधकांनी केला होता. ईव्हीएमबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या टेक्निकल एक्सपर्ट टीमनं 10 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान ईव्हीएमच्या बिघाडामागील कारण शोधून काढलं आहे. टीमनं आपला तपासणी अहवाल निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. अति उष्णता, आर्द्रता आणि यंत्रांची योग्य ती देखभाल न केल्यामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाला, असे टेक्निकल एक्सपर्ट टीमनं आपल्या अहवालात म्हटले आहे.   28 मे रोजी पोटनिवडणुकीमध्ये भीषण उष्णतेदरम्यान उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ईव्हीएममध्ये प्रचंड प्रमाणात बिघाड निर्माण झाला होता.