रेल्वेखाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

0
13

बुलढाणा,दि.10ः-देवदर्शन आटोपून गावाकडे जाण्याकरिता शेगाव रेल्वेस्थानकात ट्रेन पकडण्यासाठी आलेल्या तीन महिलांचा रेल्वेखाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आज दुपारी १२ वाजता ही दुर्देवी घटना घडली. काही महिला नरखेड सुपरफास्ट ट्रेन पकडण्यासाठी शेगाव रेल्वे स्थानकाकडे आल्या होत्या. लघूशंकेसाठी या महिल्या रेल्वे रूळालगत आल्या होत्या. मात्र याचवेळी समोरून येणाऱ्या चेन्नई ते जोधपूर या सुपरफास्ट ट्रेनने या महिलांना जोरदार धडक दिली. त्यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सरिता विजय साबे (रा. नांदुरा, वय ३०), संगीता भानुदास गोळे, (रा. नांदुरा) आणि छंदाबाई तिसरे (वय ४५) यांचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या तिन्ही महिलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत महिलांची अद्याप ओळख पटली नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रेल्वेवर प्रचंड ताण आला असून रेल्वेतील गर्दी वाढली आहे. त्यामुळे शॉर्टकटने रेल्वे पकडण्याच्या नादात या महिलांचा मृत्यू झाल्याचं सूत्रांनी सांगितले.