कमलबापूंचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकीक

0
9

आमगाव दि. ११ः: शिक्षक शिकून शिकवतो पण शिकवतानाही शिकतो. जो सतत शिकतच राहतो तो खरा शिक्षक. सेवेच्या अनुभवाचा भक्कम साठा पाठिशी असतो. कमलबापूंनी शिक्षणासोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रातही नाव लौकिक मिळविला असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य भाऊ वासनिक यांनी केले.
शिक्षक भारती परिवारच्यावतीने आयोजित कमलबापू बहेकार यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार सभारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक भारती महाराष्टÑ राज्याचे उपाध्यक्ष प्राचार्य राजेंद्र झाडे, विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे, प्राध्यापक किशोर वरभे (नागपूर), जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक विभागाचे वरिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी महेन्द्र मोटघरे, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी सुधाकर डोये, विद्या निकेतन वेल्फेयर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, केंद्र प्रमुख गुप्ता, प्राचार्य एस.एस. जीवानी, रजीया बेग, प्राचार्य दिनेश रहांगडाले, प्राचार्य दिलीप टेंभरे, प्राचार्य राम गायधने व प्राथमिक विभाग शिषक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्राम्हणकर, प्राचार्य कमलबापू बहेकार, राधा बहेकार उपस्थित होते.
कार्यक्र मात शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटनेच्या माध्यमातून स्मृती चिन्ह व त्यांच्या धर्म पत्नी राधाबाई बहेकार यांना विद्या वसंत मेश्राम व चित्रा दिलीप टेंभरे यांनी साडी व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. तर प्रकाश ब्राम्हणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमलबापू बहेकार यांच्या सपत्नीक शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
तर या कार्यक्रमात कमलबापू बहेकार यांनी सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षक भारती मुख्याध्यापक राज्य संघटनेचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष से.नि. प्राचार्य भाऊ वासनिक व विद्या निकेतन वेल्फेयर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी यांचा सत्कार कमलबापू बहेकार यांनी केला.
याप्रसंगी आमगाव विद्या निकेतन कॉन्व्हेंटचे शिक्षक देवेंद्र नागपुरे यांचा उत्कृष्ठ सुमधूर गितांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. याच वेळी कमलबापू बहेकार यांचे लग्नाचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबिय व सर्वांनी साजरा केला.